breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उन्नाव बलात्कार पीडितेचा सफदरगंज रुग्णालयात मृत्यू

उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ११.४० च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलेले होते.

तिच्यावर गेल्यावर्षी बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला दहा दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला व बलात्कार करून तिला पेटवून दिले होते. नंतर तिला जखमी अवस्थेत लखनौ येथे आणि नंतर तेथून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली वाहतूक पोलिसांनी तिला विमानतळावरून तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी विनाअडथळा हरित मार्गिका उपलब्ध करून दिलेली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button