breaking-newsमहाराष्ट्र

काँग्रेस विजयी झाल्याने कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाने अनपेक्षित कामगिरी करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्त्वात मिळवलेलं हे यश अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांसाठीही अनपेक्षित होतं. त्यामुळेच जेव्हा निकाल हाती आले तेव्हा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र जळगावात अत्यानंद झाल्याने एका कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सुरेश ठाकरे असं काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. यासोबत ते काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्षदेखील राहिले होते. जळगावमधील पारोळा तालुक्याचे ते रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर एका कार्यकर्त्याने सुरेश ठाकरे यांना फोन केला होता. विजय साजरा कऱण्यासाठी पारोळ्याला येण्यासाठी त्याने फोन केला होता. त्याच्याकडून निकालाची अधिक माहिती घेत असतानाच सुरेश ठाकरे यांना ह्रदयविकाराचा झटका आला.

त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे काँग्रेसला यश मिळाल्याचं आनंद साजरा होत असताना अशा पद्धतीने सुरेश ठाकरे यांचं निधन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button