breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या वार्षिक वसुलीत बांधकाम विभागाची उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वार्षिक वसुलीत बांधकाम विभागाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. बांधकाम विभागाने उदिष्टापेक्षा अधिक वसुली केलेली आहे. मार्चअखेर इतर विभागापेक्षा सर्वाधिक उत्पन्न मिळवण्याचा मानस विभाग प्रमुखांसह सर्वांनी ठेवला आहे.

महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने वार्षिक वसुलीत उल्लेखनिय कामगिरी केल्याने आज (बुधवारी) स्थायी समितीत विभाग प्रमुखांसह कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विभाग प्रमुख सह शहर अभियंता राजन पाटील व त्यांचे सहकारी यांचे स्थायी समिती सभेत अभिनंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक राजेंद्र गावडे, सागर अंघोळकर, नगरसेविका झामाबाई बारणे, आरती चोंधे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदि मान्यवर उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button