breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस आयुक्तालयातील दोन महिला पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

  • झोन १ च्या उपायुक्त पदी स्मिता पाटील तर २ च्या उपायुक्त पदी सुधीर हिरेमठ

पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन १ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील आणि झोन २ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज (सोमवार) गृह विभागाने काढले आहेत.

खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्मिता पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन १ च्या उपायुक्त पदी तर सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुधीर हिरेमठ यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन २ च्या उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. आज राज्यातील पोलीस सेवेतील एकूण ५२ पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नम्रता पाटील यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे करण्यात आली आहे. तर स्मार्तना पाटील यांची ठाणे शहर विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button