breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसचे नेते रोहित टिळक भाजपच्या वाटेवर? पुण्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसोबत गोपनीय चर्चा

पुणे । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते रोहित टिळक यांनी महिन्याभरापूर्वी चंद्रकांत पाटील यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती.त्यानंतर आज भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची रोहीत टिळक यांनी भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर का ? अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. देशातील अनेक राजकीय पक्षामधील नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षातील नेते आघाडीवर आहेत.तर पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते रोहित टिळक यांनी भाजपचा बालकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघातून दोन वेळेस निवडणूक लढवली.त्या दोन्ही निवडणुकीत रोहित टिळक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या या कसबा मतदार संघातून टिळक कुटुंबामधील मुक्ता टिळक या आमदार आहेत. मात्र त्या मागील काही महिन्यापासून आजारी आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे.

त्याच दरम्यान रोहित टिळक यांची चंद्रकांत पाटील यांची भेट आणि आज पशू संवर्धन आयुक्त कार्यालयामध्ये भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर विखे पाटील यांची पत्रकार परिषद होताच,रोहित टिळक यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी काही वेळ चर्चा देखील केली. या भेटीमुळे रोहित टिळक भाजपात जाणार का ? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.

या भेटीबाबत रोहित टिळक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, अनेक वर्षापासुन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत संवाद आहे.त्यामुळे आजच्या भेटीमुळे कोणत्याही प्रकाराचा राजकीय अर्थ काढू नये. मी त्यांना वैयक्तिक कामा संदर्भात भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button