breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय पुरूष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक!

Asia Cup 2023 : भारत आणि आफगाणिस्तान यांच्यात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाच्या लढाईत भारताने बाजी मारली. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक मिळाले आहे. अफगाणिस्तानपेक्षा चांगली आंतरराष्ट्रीय रँकिंग असल्यामुळे भारताने सुवर्णपदक जिंकले आहे.

भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आयसीसी टी-२० क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले.

हेही वाचा – इस्रायल पॅलेस्टाईनविरोधात आक्रमक; पॅलेस्टाईनवर केला रॉकेट्सचा वर्षाव

भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर पुरुषांनी कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदकावर नाव कोरल्याने नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तान संघाला रौप्य व बांगलादेशल संघाला कास्यपद मिळालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button