breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसचे नक्षलवाद्यांना समर्थन ; नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल !

बस्तर, छत्तीसगड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. छत्तीसगडमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगदलपूर येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. “सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असताना, काँग्रेस पक्ष मात्र नक्षलवाद्यांच्या समर्थनाथ उभा राहतो” असे खडे बोल मोदींनी काँग्रेसला सुनावले.

काँग्रेस पक्षासाठी दलित, शोषित आणि वंचित लोक म्हणजे खजिनाच आहे. काँग्रेस या लोकांचा फक्त व्होटबँक म्हणून वापर करते. अशा लोकांपासून छत्तीसगडला वाचवायचे असेल, तर छत्तीसगड आणि बस्तमधील सर्व जागांवर कमळ फुलले पाहिजे, असे आवाहन नरेंद्र मोदींनी नागरिकांना केले.

Narendra Modi

@narendramodi

Chhattisgarh supports @BJP4India! Addressing a massive rally in Jagdalpur. Watch. https://www.pscp.tv/w/brUzHDMyMjExNTJ8MU1ueG5OQlFlUWp4T3gq7hzPLpxD1ilqNhDoX-yRjkJ3fMgIyWnzm-HlILRx 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button