breaking-newsराष्ट्रिय

दोन अत्याधुनिक तोफा भारतीय सैन्यदलात सामील !

नवी दिल्ली– नाशिकमधील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र देवळाली येथे एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर आणि के.9 वज्र या दोन नव्या अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या तोफा भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, देवळाली येथील तोफखाना प्रशिक्षण केंद्रात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीत तोफखाना केंद्रात या तोफा राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या.

के.9 वज्र या तोफेव्यतिरिक्त एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर तोफेचाही सैन्यदलात समावेश होणार आहे. या प्रकल्पाची किमती 5000 कोटी रुपये एवढी आहे. 2021 पर्यंत एकूण 145 एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर तोफा सैन्यदलाकडे सोपवण्यात येतील. या अत्याधुनिक तोफेचं वजन केवळ 4.2 टन एवढे आहे.

Embedded video

ANI

@ANI

Nasik: The M777 Ultra Light Howitzer which was inducted in the Army recently,in action. Defence Minister Nirmala Sitharaman and Army Chief General Bipin Rawat were also present on the occasion

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button