breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने नोंदवला नवा रेकॉर्ड

शारजाह – कोलकाता विरुद्ध खेळलेल्या सामन्यात मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणार्‍या एबी डिव्हिलियर्सने 33 बॉलमध्ये 73 रनची नाबाद तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने पाच फोर आणि सहा सिक्स देखील लगावले. कर्णधार विराट कोहलीबरोबर त्याने 100 धावांची नाबाद भागीदारी रचली. यासह शतकी भागीदारीच्या बाबतीत विराट आणि डिव्हिलियर्स आणखी एक विक्रम नोंदविला आहे.

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे आयपीएलमध्ये १०० किंवा त्याहून अधिक धावांची सर्वाधिक वेळा पार्टनरशिप करणारे खेळाडू ठरले आहेत. दोघांनी मिळून 10 वेळा शतकीय भागीदारी रचली आहे. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी मिळून आयपीएलमध्ये एकूण तीन हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

विराट-डिव्हिलियर्सच्या आधी ख्रिस गेलबरोबर विराट कोहलीची पार्टनरशिप आघाडीवर होती. गेल पूर्वी रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझीचा भाग होता. त्यावेळी त्याने विराट कोहलीबरोबर एकूण नऊ वेळा शतकीय भागीदारी केली होती.

शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आयपीएलमध्ये पाच वेळा, डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोने एकूण पाच वेळा शतकीय भागीदारी केली आहे. रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी पाच वेळा अर्धशतकीय भागीदारीची नोंद केली आहे.

एबी डिव्हिलियर्स 13 व्या ओव्हरमध्ये ऍरोन फिंच बाद झाल्यानंतर मैदानात आला. त्यावेळी बंगळुरूची धावसंख्या 94/2 होती. डिव्हिलियर्सने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलमधूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर आरसीबीचा स्कोर 20 ओव्हरमध्ये 194/2 असा झाला. विराट आणि डिव्हिलियर्सने नाबाद खेळी खेळली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button