breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन

नवी मुंबई – कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुन्या फळीतले शिवसैनिक असलेल्या देवळेकर यांच्या निधनाने कल्याण शहरात मोठी हळहळ व्यक्त होतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळेकर यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर डोंबिवलीच्या निऑन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिथे प्रकृती खालावल्याने त्यांना नवी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे गेल्यावर ते कोरोनातून मुक्त झाले, मात्र मल्टी ऑर्गन फेल्युअरचा सामना त्यांना करावा लागला. अखेर मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

राजेंद्र देवळेकर हे सलग चार वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. संघटनेसाठी कायम झटणारे नेते, मनमिळावू आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून देवळेकर परिचयाचे होते. २०१५च्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाल्यानंतर देवळेकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे मार्ग लावली. पालिका कार्यक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.

देवळेकर रुग्णालयात दाखल असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पीपीई किट घालून त्यांची भेट घेतली होती, तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील रुग्णालयात जाऊन देवळेकर यांची भेट घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button