breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

मराठा आरक्षणावर दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषद, निर्णयाकडे मराठा समाजाचं लक्ष

कोल्हापूर | महाईन्यूज

मराठा आरक्षणावर भूमिका निश्चित करण्यासाठी कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. नुकतेच गोलमेज परिषदेला सुरूवात झाली आहे. राज्यातल्या अनेक मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत. परिषदेत काय निर्णय घेतले जातात, त्याकडे सखल मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

गोलमेज परिषदमधून पुढच्या आंदोलनाची आणि आरक्षणाबाबतच्या लढ्याची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे गोलमेज परिषदेत नेमके कुठले ठराव आज केले जातात. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आजच्या गोलमेज परिषदेनंतर येत्या 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये धनगर समाजानेही गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.

गोलमेज परिषदेत या मुद्यांवर होणार विचार…

  • मराठा समाजाला शिक्षणात 12% व नोकरीमध्ये 13% आरक्षण मिळाले आहे. पण त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे.
  • मराठा आरक्षणामध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाने नोकरी व त्या कुटुंबाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात ते मिळालेले नाही. याबाबत निश्चित कालमर्यादा ठरविण्यात यावी.
  • राज्य सरकारने मराठा समाजाच्या मुलांचे व मुलीचे सर्व प्रकारच्या शिक्षणाची शुल्क (फी) भरावी.
  • राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मराठा विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभे करणेसाठी शासनाचे लक्ष वेधणे आदी यासह विविध मागण्यांबाबत चर्चा केली जाणार आहे.
  • सारथी संस्था सुस्थितीत चालविणेसाठी रुपये 500 कोटीची आर्थिक तरतूद करून मराठा समाजातील जास्तीत जास्त मुलांना फायदा करून देणेत यावा.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button