breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

करोना प्रादुर्भाव रोखण्यास, कर्मचा-याने जबाबदारीने काम करावे – आयुक्त श्रावण हर्डिकर

पिंपरी |महाईन्यूज|

करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणे ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी आपआपसात समन्वय राखून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने गांभिर्याने काम करावे. जबाबदारी पार पाडण्यात कोणी कसूर केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.

करोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची आज समन्वय बैठक घेण्यात आली. करोना संदर्भात केलेल्या कामकाजाचा आढावा आणि पुढील नियोजनासंदर्भांत या बैठकीत आयुक्तांनी सूचना दिल्या. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाँ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डाँ. पवन साळवे, शहर अभियंता राजन पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वयक उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

करोना विषांणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी कराव्या लागतील त्याचे पूर्वनियोजन करून ज्या सामुग्रीची आवश्यकता लागेल त्याची तात्काळ खरेदी करण्याची सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या. नागरीकांमध्ये जनजागृती करून त्यांना या आजाराबाबत कशी दक्षता घ्यावी या बद्दल सर्व स्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन करावे. आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे मास्क, हातमोजे तसेच निर्जंतूकीकरण
द्रव्य (सॅनिटायझर) उपलब्ध करून द्यावे तसेच त्यांना याबाबत प्रशिक्षणही देण्यात यावे. ज्या विभागातील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी कामकाजानिमित्त थेट संपर्क येतो, त्यांनी स्वत:ची पुरेशी काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच व्यवहार करावा असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. विवाहनोंदणी तथा आधारकार्ड नोंदणी साठी येणाऱ्या
नागरिकांनी गर्दी करू नये अशी सुचनाही त्यांनी केली. प्रत्येक विभागाने कोणते काम करायचे या बाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले.

उद्याने, सार्वजनिक वाचनालये, स्पर्धा परीक्षा केंद्र, शाळा आदि ठिकाणी नियुक्त असलेल्या मनुष्यबळाचा वापर करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी करून घेतला जाणार आहे. शिवाय महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सतर्क रहावे असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.

केंद्र तसेच राज्यशासनाकडून करोना विषाणू आजारासंदर्भात प्राप्त झालेल्या सुचना आणि आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. तसेच महापालिका स्तरावर निर्गमित होणाऱ्या विविध आदेश आणि सुचनांचे पालन करण्यासाठी अंतर्गत समन्वय ठेवून काम केल्यास आलेल्या संकटावर मात करणे सहज शक्य असल्याचेही आयुक्त
श्रावण हर्डीकर बैठकीत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button