breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आईने कष्टानं कमावलेल्या पैशांवर मुलानं बाया नाचवल्या, बिंग फुटताच पोलिसही चक्रावले

मुंबई – आईनं मुलाकडे कष्टानं कमावलेले पैसे ठेवायला दिले. मात्र, आईनं पैसे परत मागताच मुलानं दारु आणि इतर व्यसनात उडवले, असं सांगितलं होतं. परंतु, आता मुलाचं बिंग फुटलं आहे. समोर आलेल्या माहितीमुळे आईसह पोलिसही चक्रावले आहेत.

सोहन पाल असं मुलाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला रक्तानं माखलेल्या कपड्यात जखमी अवस्थेत आरेच्या झुडूपातून शोधून काढलं. ‘मला एका महिलेने संमोहित केलं होतं. माझ्याकडे असलेले पैसे घेवून ती महिला पळून गेली. तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण महिलेने तिच्या जवळील ब्लेडनं माझ्यावर सपासप वार केले. मला जखमी करुन माझ्याकडील 4 लाख रुपये घेवून ती पळून गेली’, असा जबाब सोहम पाल या तरुणानं पोलिसांकडे नोंदवला आहे.

हे आहे प्रकरण?

कष्ट करुन पै पै जमवून 4 लाख रुपये सोहनच्या आईनं दिवाळीपूर्वी सोहनकडे ठेवायला दिले होते. काही दिवसांनी आईनं ते पैसे सोहनकडे परत मागितले. तेव्हा संध्याकाळी पैसे आणून देतो, असं सांगून सोहन घराबाहेर पडला. मात्र, रात्री पोलिसांचा फोन सोहनच्या आईला आला आणि सोहनने आई व पोलिसांना त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. दिवसांपासून 3 दिवस पोलिस तपास करत होते. पण काहीच हातात लागत नाही, हे लक्षात आल्यावर पोलिसांनी तिसऱ्या दिवशी पुन्हा सोहनची चौकशी केली यावेळेस मात्र सोहन गडबडला आणि त्याचं बिंग फुटलं.

सोहन आरेच्या झुडूपात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना सापडला. सोहन सोबत काय घडले हे त्याने पोलिसांना सांगितले. अगदी चित्रपटात घडावी तशी घटना सोहन सोबत घडली आणि तो गंभीर जखमी झाला. सोहननं सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तपास केला आणि त्या महिलेचा शोधही घेतला. महिला काही सापडली नाही. पण सोहनसोबत नेमकं काय घडलंय हे पोलिसांना कळताच पोलिसांच्या पाया खालची वाळूच सरकली आहे.

मुलाच्या पराक्रमाने आईचं स्वप्न धुळीला

घर घेण्यासाठी सोहनच्या आईनं पै पै करून पैसे जमवले होते. विश्वासानं ते आपला मुलगा सोहनकडे ठेवायला दिले होते. पण दारु करता सोहननं ते बाईवर उडवले. आईचं सर्व स्वप्न धुळीस मिळवलं. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाच्या आदेशाने पोलिस गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button