breaking-newsराष्ट्रिय

करदातेच मोदींना 1 लाख कोटी देतील – राहुल गांधी

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी व्यवहारावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. राफेल विमान कंपनीकडून खरेदी केल्या जाणाऱ्या 36 लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी लागणारे 1 लाख कोटी रुपये जमा करण्यासाठी देशातील करदात्यांना पुढील 50 वर्षे कर जमा करावे लागतील, असे राहुल गांधी म्हणाले.

View image on TwitterView image on Twitter

Rahul Gandhi

@RahulGandhi

Over the next 50 years, Indian Tax Payers will pay Mr 56’s friend’s JV, 100,000 Cr to maintain 36 jets, India is buying🤭

Raksha Mantri will address a Press CON to deny this, as usual🤥

But the truth is in the presentation I’m attaching😊

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख “56′ मित्र’ (56 इंच छाती असलेले) असा केला. लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी या शब्दांत कॉंग्रेसवर शेरेबाजी केली होती. त्याच्या संदर्भ देत चीन आणि पाकिस्तानलाही 56 इंचांची छाती कधी दाखवणार, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, राफेल खरेदी व्यवहारातून मोदी यांनाच 20 अब्ज डॉलर (1.30 लाख कोटी रुपये) फायदा होणार असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी काल केला होता. राफेल विमान खरेदीत नियम डावलून रिलायन्स डिफेन्स कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोपही कॉंग्रेसकडून केला जात आहे. या प्रकरणी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्यावर केला होता.

जवळच्या भांडवलदार मित्रांच्या फायद्याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे वर्णन कॉंग्रेस पक्षाने केले होते. देशाच्या हिताशी तडजोड केल्याच्या आरोपावरून पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांविरोधात कॉंग्रेसने लोकसभेमध्ये हक्कभंगाची नोटीसही दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button