breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कार्यकर्त्यांसह गणरायाचाही फेटय़ात रुबाब

गणेशमूर्तीच्या मस्तकी घालता येणाऱ्या फेटे, पगडय़ांना मागणी; फेटा बांधण्यासाठी विशेष कारागिरांचीही मदत

गणेशोत्सव आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीत एकाच रंगाचे फेटे मस्तकी धारण करून मिरवणारे कार्यकर्ते दरवर्षीच पाहायला मिळतात. मात्र यंदा गणेशमूर्तीच्या मस्तकावर परिधान करता येणाऱ्या फेटे आणि पगडय़ांचीही मागणी वाढत आहे. अगदी ५५० रुपयांपासून १२५० रुपयांपर्यंत मिळणारे हे फेटे बांधून देणाऱ्या विशेष कारागिरांनाही पाचारण करण्यात येत आहे.

गणपती मिरवणुकांमध्ये डोक्याला एकसारखे फेटे किंवा पगडय़ा बांधण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजली आहे. यासाठी लालबाग आणि दादरच्या बाजारातील ‘रेडी टू वेअर’ पद्धतीच्या तयार फेटे आणि पगडय़ांना मोठी मागणी आहे. खासकरून कोल्हापुरी फेटा आणि पुणेरी पगडीला विशेष पसंती मिळत असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र आता आपल्या गणपतीसाठीही तुरेवाला फेटा किंवा पगडीची मागणी होत आहे. मूर्तीच्या मुकुटच्या आकारमानाप्रमाणे फेटा किंवा पगडी तयार करण्याची मागणी घेऊन गणेशभक्त व्यापाऱ्यांकडे जात आहेत.

मागणी वाढल्यामुळे गणेशमूर्तीसाठी खास पद्धतीचे ‘रेडी टू वेअर’ फेटे आणि पगडय़ा लालबाग आणि दादरच्या बाजारातील काही व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यावर मोत्यांच्या माळा, तुरा आणि एखादे पदक लावून त्यांची सजावट करण्यात येते. सध्या ८ ते २४ इंचापर्यंतचे ‘रेडी टू वेअर’ फेटे आणि पगडय़ा दुकानात उपलब्ध असल्याची माहिती दादरच्या ‘साडीघर’चे मालक गौरव राऊत यांनी दिली.

फेटय़ांमध्ये कोल्हापुरी तर पगडीमध्ये पुणेरी आणि ‘जय मल्हार’ पगडीला विशेष मागणी आहे. आतापर्यंत सुमारे ६० गणेशमूर्तीसाठी अशा प्रकारचे फेटे तयार

फेटा प्रत्यक्ष बांधण्यासाठी मागणी

‘रेडी टू वेअर’ फेटय़ांप्रमाणेच गणेशमूर्तीला फेटा बांधण्याचे काम काही तरुण करत आहेत. श्याम मटकर आणि विनय निकम हे दोन तरुण मूर्तीला फेटा बांधण्याचे काम करतात. गेल्या दोन वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना फेटे बांधण्याचे काम हे दोघे करत आहेत. यंदा मात्र विशाल शिंदे यांनी बनविलेल्या मातीच्या मूर्तीला त्यांनी फेटा बांधला आहे. पीओपीच्या मूर्तीपेक्षा मातीची मूर्ती नाजूक असल्याने तिला फेटा बांधणे अवघड काम असल्याचे श्याम सांगतो. मूर्तीला साजेशा रंगाची साडी निवडून ती फेटय़ाकरिता वापरली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button