breaking-newsमनोरंजन

कंगनाच्या ‘तेजस’च्या चित्रिकरणाला डिसेंबरपासून होणार सुरुवात

मागील वर्षी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’च्या अभूतपूर्व यशानंतर आरएसवीपीचा वायु सेनेवरील आगामी चित्रपट ‘तेजस’ चित्रपटाच्या चित्रिकरणाला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

कंगना रानौत अभिनीत ‘तेजस’ एक साहसी आणि निडर फाइटर पायलटची कहाणी आहे. 2016 मध्ये भारतीय वायु सेना महिलांना प्रत्यक्ष युद्ध भूमिकेत सहभागी करणारी देशातील पहलीच सुरक्षा सेना होती आणि हा चित्रपट याच ऐतिहासिक घटनेने प्रेरित आहे.

कंगना म्हणते की, “तेजस एक विस्ताराने सांगितलेली कहाणी आहे, ज्यात मला वायु सेनेच्या पायलटची भूमिका निभावण्याचे सौभाग्य मिळाले. मी एका अशा चित्रपटाचा भाग बनून स्वतःला गौरवशाली अनुभवत आहे, जिथे गणवेषात प्रत्येक पराक्रमी पुरुष आणि महिलेला सलाम केला जाईल, जो प्रत्येक दिवशी आपल्या कर्तव्यात अपार बलिदान करतात… आमच्या चित्रपटात सशस्त्र दल आणि यातील हिऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सर्वेश आणि रॉनीसोबत या प्रवासासाठी मी खूपच उत्साहित आहे.”

अभिमानाची भावना निर्माण करण्याच्या हेतुने लिहिण्यात आलेली आणि सर्वात महत्वपूर्ण, आपल्या राष्ट्राच्या तरुणांना प्रेरित करत, या चित्रपटात आपल्याला काही सर्वात आव्हानात्मक मिशनचा परिचय करून देण्यात येणार आहे ज्याला आपण आपल्या शक्तीने आतंकवादाला आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी तडीस नेले आहे.

सर्वेश मेवाड़ाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित करण्यात आलेली, ही उरी: द सर्जिकल स्ट्राइक नंतर आरएसवीपीची ही दुसरी फिल्म आहे जी देशाच्या सशस्त्र शक्तींना सलाम करते आणि देशाला प्रेरित करण्याचे एक भव्य लक्ष्य ठेवते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button