breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ओटास्किम परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

पिंपरी |प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी ओटास्किम येथे कोयत्याच्या धाकाने लोकांना धमकावताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करत त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली.

आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय 21, रा. राहुलनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी 31 डिसेंबर 2020 रोजी एकाच वेळी शहरातील 24 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा गुन्हेगारांचा समावेश होता. त्यात पोलिसांनी आरोपी आदर्श याला देखील तडीपार केले

वाचा:-सायन्सपार्क ३० जानेवारीपासून नागरिकांसाठी खुले होणार..!

तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहराच्या हद्दीत आला. तसेच तो मंगळवारी (दि. 26) सायंकाळी साडेसात वाजता त्याने कोयत्याच्या धाकाने अंकुश चौक, ओटास्किम येथे टपरी धारक आणि वाटसरू नागरिकांना धमकावून दहशत निर्माण केली.

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला कोयत्यासह अटक केली. आरोपी आदर्श याच्यावर तडीपारीच्या आदेशाचा भंग करणे आणि शस्त्राच्या धाकाने दहशत निर्माण करणे, या कलमांखाली कारवाई करत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. पोलीस नाईक विलास केकाण तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button