breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाकड, वेणूनगरमध्ये विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन आणि ज्येष्ठ नागरिक सवलत पास वाटप

  • माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते भूमीपूजन
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविला जातोय स्तुत्य उपक्रम

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

वाकड येथील वेणुनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ आज माजी नगरसेवक विनायक गायकवाड आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड यांच्या हस्ते पार पडला. विनायकदादा गायकवाड युथ फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक सवलत पासचे वाटप यावेळी करण्यात आले.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र होत आहे. याचा या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या भूमिपूजन समारंभ प्रसंगी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक संदीप कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, पिंपरी-चिंचवड फेडरेशनचे अध्यक्ष  सुदेश राजे, सेक्रेटरी के. सी. गर्ग, अरुण देशमुख, तेजस्विनी ढोमसे व विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते. वाकड-पिंपळे निलख परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले, “वाकड परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, सर्वांनी मिळून मागणी केलेली होती, आम्हा सर्व ज्येष्ठांसाठी एखादे ठिकाण हवे, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र महापालिकेमार्फत तयार होत आहे. यामध्ये आपण व्यायामासाठी ओपन जीम, गझीबो, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी व एक हॉलची व्यवस्था असणार आहे. या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

तसेच, आता महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड आवश्यक केल्याने सर्व ज्येष्ठ नागरिकांना बसस्थानकात हेलपाटे मारावे लागत होते. त्यांना त्रास होत असल्याकारणाने आपण याठिकाणी सवलत पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button