breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एसटीच्या ठाणे विभागाला कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता; अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह एसटीचा प्रवास

कोरोनाचा धसका तसेच लॉकडाउनमुळे गावी अडकून पडल्याने एसटीच्या ठाणे विभागाला कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत होती. आता कर्मचाऱ्यांची हजेरी जवळपास ७५ टक्क्यांवर गेली असली तरी अद्याप २५ टक्के कर्मचारी कामावर आलेले नाहीत. ठाणे विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. भीतीपोटी हे कर्मचारी कामावर येण्यास टाळत असून मधुमेह तसेच अन्य आजार असलेले ५०, ५५ वर्षांपुढील कर्मचारी कामावर येत नसल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा धसका तसेच लॉकडाऊनमुळे गावी अडकून पडल्याने एसटीच्या ठाणे विभागाला कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत होती. आता कर्मचाऱ्यांची हजेरी जवळपास ७५ टक्क्यांवर गेली असली तरी अद्याप २५ टक्के कर्मचारी कामावर आलेले नाहीत. ठाणे विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. भीतीपोटी हे कर्मचारी कामावर येण्यास टाळत असून मधुमेह तसेच अन्य आजार असलेले ५०, ५५ वर्षांपुढील कर्मचारी कामावर येत नसल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनमध्येही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी सेवा चालू असली तरी बहुसंख्य कामगारवर्ग गावी गेल्याने प्रशासनापुढे कर्मचारी तुटवड्याची काहीशी अडचण निर्माण झाली होती. कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाई करू, असा इशाराही कर्मचाऱ्यांना दिला होता. लॉकडाउनमुळे एसटीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद होती. शिवाय लॉकडाऊनच्या काळात प्रवासाची इतरही साधने नसल्याने गावावरून येणार तरी कसे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे होता. त्यातही एसटीच्या ठाणे विभागात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले.

आतापर्यंतचा बाधित कर्मचाऱ्यांचा आकडा १९५ च्या आसपास असल्याचे एसटीतील अधिकारी सांगतात. ऑगस्ट महिन्यात मात्र एसटीला आंतरजिल्हा प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली. मात्र सुरक्षित वावराचे पालन व्हावे यासाठी बसमधून केवळ ५० टक्केच प्रवाशांची वाहतूक करणे बंधनकारक होते. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला आणखी तोटा सहन करावा लागत होता. मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पूर्ण आसनक्षमतेने बस चालवण्यास एसटीला परवानगी मिळाल्यानंतर बसमधून १०० टक्के प्रवाशांची वाहतूक सुरू झाली. त्यानुसार एसटीच्या ठाणे विभागातील बसही पूर्ण आसनक्षमतेने धावण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे या विभागात अद्यापही अपूर्ण मनुष्यबळाची समस्या कायम असल्याचे दिसून येते.

आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यापासून कर्मचारी हळूहळू कामावर येण्यास सुरुवात झाल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची हजेरी ७५ टक्क्यांवर गेल्याचेही अधिकारी सांगतात. मात्र २५ टक्के कर्मचारी अद्याप कामावर आले नाहीत, असेही सांगितले जात आहे. एखाद्या कर्मचाऱ्यास करोनाची लागण झाल्यास तो बरा होईपर्यंत काही दिवस जातात. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास भीती वाटत आहे. शिवाय ५० वर्षांपुढील कर्मचारी ज्यांना इतर आजार आहेत, तेही कामावर येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के असल्याचे सांगितले जाते. परंतु कर्मचाऱ्यांअभावी पूर्ण क्षमतेने बस चालवण्यास अडचण येत असल्याने तातडीने कामावर हजर होण्याबाबत आगारात नोटिसाही लावण्यात येत असल्याचेही कळते.

राहण्याची सोय नसलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाचा आधार असतो. खोपट बस स्थानकात दोन विश्रांतीगृह आहेत. मात्र, सुरक्षित वावराचे पालन करण्यास अडचण निर्माण होऊ लागल्याने खोपट येथीलच महिला कर्मचाऱ्यांसाठी असलेली दोन विश्रांतीगृह पुरुष कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. महिलांच्या विश्रांतीगृहात कोणी राहत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची राहण्याची अडचण दूर झाल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button