breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

बापरे! दिल्ली पोलिसांकडून धाडीत तब्बल 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दर्शवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांना विक्री

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांसंदर्भात आज एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी एका तस्करांकडून सुमारे 160 किलो गांजा (Ganja) जप्त केला आणि दुसर्‍या तस्करांना लाखो रुपयांमध्ये विकला. यावेळी पोलिसांनी नोंदीमध्ये केवळ 1 किलो गांजा जप्त केल्याचं दाखवलं आणि संबंधित गांजा तस्करांना सोडून दिलं होते. या प्रकरणी सध्या 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं आहे. दरम्यान, 11 सप्टेंबर रोजी जहांगीरपुरी पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका हवालदाराने गांजा तस्कर अनिलला अटक केली होती. त्यानंतर अनिलच्या घरावर छापा टाकल्यानंतर सुमारे 160 किलो गांजा सापडला होता.

मात्र, पोलिसांनी तस्करांना सोडून दिले आणि रेकॉर्डमध्ये केवळ एक किलो गांजा सापडल्याची नोंद केलेली होती. प्राप्त माहितीनुसार, हवालदारने उर्वरित भांग पोलिस ठाण्याच्या स्टोअरमध्ये ठेवलेला होता. या हवालदाराने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दुसर्‍या तस्करांना हा गांजा विकून लाखो रुपये वाटून घेतले होते. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताचं त्यांनी चार आरोपी पोलिसांना निलंबित केलेले आहे. यात दोन उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी सध्या पोलीस ड्रग पेडलर अनिलचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button