TOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी पिंपरी चिंचवडचे दोन विद्यार्थी कियांश डाकलिया अमीन शेख भारतीय संघात निवड…


पिंपरी चिंचवड | कियांश डाकलिया याच -32 किलोव अमीन शेख -३६ वजन गटामध्ये दि. १ ते ९ ऑक्टोबर रोजी व्हेनिस, इटली येथे होणाऱ्या “वाको चिल्ड्रन, कॅडेट आणि ज्युनियर किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२” ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय संघात निवड झालेली आहे. दि. १-९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये संपूर्ण जगभरातून स्पर्धक सहभागी होणार आहे. वाको वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात संपूर्ण देशभरातून निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कियांश व अमीन हे भारतीय संघामधील सर्वात लहान खेळाडू आहे अशी माहिती भारतीय संघाचे कोच व महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश शेलार यांनी दिली. अमीन व कियांश यांनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळवलेले असून हा पिंपरी चिंचवड मध्ये रुद्र मार्शल आर्ट्स क्लब मधील कु .शुभम समीर कानडे अध्यक्ष (किकबॅाक्सिंग स्पोटर्स असोसिएशन पिंपरी चिंचवड ) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून व महाराष्ट्रभरातून दोन्ही खेळाडु वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button