breaking-newsक्रिडा

एडमंडवर मात करून अँडी मरेचे पुनरागमन

  • वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धा
वॉशिंग्टन: तीन ग्रॅंड स्लॅम विजेता ब्रिटिश टेनिसपटू अँडी मरेने चतुर्थ मानांकित कायली एडमंडवर संघर्षपूर्ण मात करताना वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत धडक मारली. कंबरेच्या दुखापतीमुळे सुमारे 11 महिने स्पर्धात्मक टेनिसला मुकलेल्या मरेचा पुनरागमनानंतर हा सर्वात मोठा विजय ठरला. मरेने एडमंडवर 7-6, 1-6, 6-4 असा विजय मिळविला. या विजयामुळे आपला आत्मविश्‍वास परत आल्याचे मरेने सांगितले.
दरम्यान गतविजेत्या अलेक्‍झांडर झ्वेरेव्हने ट्युनिशियाच्या मालेक जाझिरीचे आव्हान 6-2, 6-01 असे मोडून काढताना तिसरी फेरी गाठली. मात्र झ्वेरेव्हसमोर आता त्याच्या थोरल्या भावाचे आव्हान आहे. 15 व्या मानांकित मिशा झ्वेरेव्हने अमेरिकेच्या टिम स्मायझेकचा कडवा प्रतिकार 6-2, 7-6 असा मोडून काढताना आगेकूच केली.
मी 12 वर्षांचा असताना मिशा 22 वर्षांचा होता. आम्ही आमच्या घराच्या अंगणात अनेकदा विम्बल्डन फायनल खेळलो आहे, असे सांगून अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह म्हणाला की, मी त्याच्याविरुद्ध जिंकल्याचे मला कधीच आठवत नाही. परंतु ही खरीखुरी स्पर्धा आहे. उद्या आमच्या सामन्यात काय होईल हे मला सांगता येत नाही.
दरम्यान, महिला गटांत अमेरिकन ओपन विजेत्या स्लोन स्टीफन्सला 91व्या क्रमांकावर असलेल्या अँड्रिया पेटकोविचकडून 6-2, 4-6, 2-6 असा सनसनाटी पराभव पत्करावा लागला. आगामी अमेरिकन ओपनमध्ये आपले विजेतेपद राखण्याचे आव्हान असलेल्या तिसऱ्या मानांकित स्टीफन्सची यंदाच्या मोसमात हार्डकोर्टवरील ही पहिलीच स्पर्धा होती. स्टीफन्सच्या पराभवामुळे विजेतेपदाची स्पर्धा तीव्र बनली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button