breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई, ठाणे, कोकणमध्ये येत्या 24 मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, ठाणे, कोकणमध्ये येत्या 24 तासांत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून राज्याभरात वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर पुढील 24 तास ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर जुलै महिन्यात आणि ऑगसट्या पहिल्या आठवड्यात पावसाने मुंबई सह पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button