breaking-newsक्रिडा
पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड
सप्टेंबरमध्ये ब्राझीलला होणार रवाना
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच 5 खेळाडूंची निवड भारतीय विद्यापीठ बुद्धिबळ संघात झाली आहे. के. आय. आय. टी. विद्यापीठ, भुवनेश्वर यांच्या वतीने जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील बुद्धिबळ क्रीडॉप्रकारासाठी भारतीय विद्यापीठ संघात या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने यांनी दिली.

ही स्पर्धा ब्राझील देशातील आराकजू या शहरात 12 ते 18 सप्टेंबर 2018 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी आठ स्पर्धकांमधील सहा स्पर्धक हे विद्यापीठाचे खेळाडू आहेत. विद्यापीठाच्या वतीने सहा खेळाडूंना निवड चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.
निवड झालेले खेळाडू व त्यांची महाविद्यालये पुढीलप्रमाणे – 1. निखिल दीक्षित- स प महाविद्यालय, 2. रणवीर मोहित- बीएमसीसी महाविद्यालय, 3. संजाना जोईल- मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, 4. श्रेया आणेकर- कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज व 5. ऋजुता देसाई- ट्रिनिटी इंजिनिअरिंग कॉलेज, पिसोळी