breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एचडीएफएल घोटाळा |वाधवान कुटुंबीय पाचगणीत क्वारंटाइन

मुंबई | कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन असताना DHFL घोटाळ्यातील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली.

या प्रकरणाने सरकारचे लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवल्याचं कळतंय. वाधवान कुटुंबियांना आता महाबळेश्वरच्या सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे.वाधवान कुटुंबियांना विशेष प्रधानसचिवांच्या पत्राने हा प्रवास केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. महाबळेश्वरला पोहोचल्यावर तेथील गावकऱ्यांनी ही धक्कादायक माहिती उघड केली. या प्रकरणाची रितसर तक्रार करण्यात आली. यानंतर या वाधवान बंधूंना त्यांच्या कुटुंबियांसह पाचगणीतील सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button