breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळातून युतीचा उमेदवार कोण?, कार्यकर्त्यांची नाराजी पडणार राष्ट्रवादीच्या पथ्यावर

  • बारणे-जगताप मनोमिलन घडविण्यात बापटांना अपयश
  • म्हणून, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची झाली संभ्रमावस्था

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. त्यांचा प्रचारही जोमाने सुरू झाला. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिका-यांमधील वाद मिटत नसल्यामुळे युतीचा उमेदवार कोण, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून ही संभ्रमावस्था राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वाटू लागली आहे.

  • राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून उमेदवारी दिल्याने राज्यभरातील राजकीय धुरीणांचे लक्ष मावळकडे लागले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी लावून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. तर, दिग्गज नेत्यांच्या सभा देखील जोरात सुरू आहेत. शिवसेना-भाजप युतीचा मात्र उमेदवार ठरत नसल्याने कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढत चालला आहे. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांचा अविश्वास निर्माण होण्यावर होत आहे.

भाजप-शिवसेना युती झाली असली तरी पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सुमारे 50 नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मावळ भाजपकडे सोडवून घेण्याचे पत्र देऊन मागणी केली आहे. अन्यथा युतीचा उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांचे काम आम्ही कदापी करणार नाही, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली. त्यांची ही भूमिका आज देखील कायम आहे. त्याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी देखील आला. युतीची पिंपरी-चिंचवड मधील पहिली बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये पार पडली. त्याठिकाणी सर्वजण उपस्थित होते. मात्र, शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित नव्हते. त्यामुळे बारणे आणि जगताप यांच्यातील नाराजी दूर करण्यात बापटच काय तर मुख्यमंत्र्यांना देखील यश येत नसल्याचे चित्र आहे.

  • या दोघांचे मनोमिलन घडवून आणण्यात अपयश येत असल्यामुळे स्थानिक पातळीवरील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बारणे यांचे काम कसे करतील, हा प्रश्न कायमच पक्षश्रेष्ठींना सतावत असणार. त्यामुळे मावळचा उमेदवार ठरण्यास विलंब होत आहे. बारणे हे संभाव्य उमेदवार माणले जात असले तरी जगताप त्यांचा प्रचारक म्हणून कसे काम करतील, यावर प्रश्नचिन्ह आहे. जरी केले तरी याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होणार नाही, कशावरून?. युतीचा उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. तो राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button