#CoronaVirus | बॉलिवूड गायिका कनिका कपूर ठणठणीत
मुंबई | कोरोनाचा फैलाव होत असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना मुक्त झाली आहे. तिची सहावी चाचणी निगेटिव्ह आली आहे. पहिल्या पाच चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या होत्या.
मात्र, त्यानंतरची चाचण्या निगेटिव्ह आल्याने कनिका कपूरच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कनिका कपूरची उत्तर प्रदेश पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तसेच कनिकाला घरी सोडल्यानंतर तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.कनिका परदेस दौऱ्यावरुन भारतात आली होती. तिला कोरोना झाल्याची माहिती तिने लपवून ठेवली होती. त्यानंतर तिने तीन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूड स्टार, क्रिकेट पट्टू, राजकीय नेतेही उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला होता. दरम्यान, अनेकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. तर एक खासदार दुष्यंत यांची पॉझिटिव्ह चाचणी आली होती. त्यानंतर ते संसदेत अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर संसद पूर्णत: निर्रजंतूनक करण्यात आली होती. तसेच योग्य ती खबरदारी घेतली. जे खासदार दुष्यंत यांच्या संपर्कात आले त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते.