breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपा “ड” क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण नोंदणीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयमार्फत राबविण्यात येणा-या दुस-या टप्प्यातील “अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२” या उपक्रमांतर्गंत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण करण्यात येत असून मनपा “ड” क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत वार्ड २९ मध्ये श्रृष्टी चौकात सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये, मनपा कर्मचारी व आईसी टीम द्वारे सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणामध्ये माहिती देण्यात आली. या उपक्रमामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून केंद्र सरकारने विचारलेल्या प्रश्नावलीत ऑनलाईन अभिप्राय नोंदविला.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी, सकारात्मक परिणाम करणा-या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाद्वारे भारतातील शहरांमधील ऑनलाईन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

‘अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२’ हा उपक्रम दि. ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२२ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विविध आस्थापना यांचा सहभाग अपेक्षित आहे. अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी संपूर्ण शहरामध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रॅली, पथनाट्य, वॉल ग्राफिटी, स्पर्धा, सर्वेक्षण अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅप आणि सोशल मिडिया चॅनेल्स या माध्यमातून जनजागृती करून सदर उपक्रम राबविण्यात येणार असून https://eol2022.org/ लिंकद्वारे अभिप्राय नोंदवून नागरिक उपक्रमात सहभागी होत आहेत. पिंपरी चिंचवड शहराला प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेवून सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त शेखर ‍सिंह यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button