breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देणारे गुप्ता सक्तीच्या रजेवर

मुंबई | कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात गुरूवारी २४ तासांत २५ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळल्याची माहिती समोर आली. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे नियम आणखी कडक केले जात असताना वाधवान कुटुंबियांतील २३ जणांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याकरता व्हीआयपी पास मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वाधवान कुटुंबियांना शिफारशीचे प्रवासाचे पत्र देण्याऱ्या अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

येस बँक, DHFL घोटाळ्यातील आरोपी वाधवान ब्रदर्स यांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी विशेष प्रधानसचिव अमिताभ गुप्ता यांचे शिफारशीचे पत्र दिले जाते. या पत्रावर एक-दोघे नाहीत तर तब्बल २३ लोकांनी प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले असून अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button