breaking-newsमनोरंजन

एका साहसी दृश्यासाठी राजामौलींनी खर्च केले इतके कोटी रुपये

एस.एस.राजामौलीच्या दोन चित्रपटांनी भारतीय सिनेसृष्टीत वेगळाच इतिहास घडवला होता. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या प्रथितयश दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराची असते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण असतो असं अनेक कलाकारांकडून सांगण्यात येतं. आता राजामौलींचा बहुप्रतीक्षित ‘RRR’ चित्रपट येत आहे.

टॉलिवूड सुपरस्टार राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत या चित्रपटात आलिया भट्ट व अजय देवगणसुद्धा दिसणार आहेत. सगळ्यांनाच या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे. एका वृत्तानुसार, असे समजले आहे की, या चित्रपटात राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांची काही साहसी दृश्य आहेत. तब्बल ४५ कोटी रुपये या सीनवर खर्च केले जाणार आहेत. या दृश्यांमध्ये २००० इतर कलाकारही दिसणार आहेत.

‘RRR’ चित्रपटात अभिनेता राम चरण व ज्युनिअर एनटीआर सैनिकांची भुमिका साकारणार असून आलिया भट्ट आणि अजय देवगण सहाय्यक कलाकार असणार आहेत. ‘अजय देवगणने चित्रपटात महत्वाची भुमिका साकारण्यास होकार दिला आहे. तो या चित्रपटाचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे’ असं राजामौली यांनी ट्विट करून सांगितले होते. आलिया भट्टने ‘राजामौलींसोबत तसेच राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांच्यासोबत काम करणे म्हणजे माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छापूर्ण होण्यासारखे आहे. मी दक्षिणात्य चित्रपटात पहिल्यांदा काम करणार असून मी त्यासाठी फार उत्साही आहे’ असं ट्विट केले होते.

‘RRR’ चित्रपट ३० जुलै २०२०ला प्रदर्शित होणार असून तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम इतर प्रादेशिक भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button