breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: आश्चर्यकारक! फणस डोक्यात पडून रिक्षाचालक जखमी, रुग्णालयात नेलं असता करोना पॉझिटिव्ह

आंबा आणि फणस या दोन फळांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेष महत्व असतं. केरळमध्ये कासरगोड जिल्ह्यात एक रिक्षाचालक डोक्यावर फणस पडून जखमी झाल्याची घटना घडली. उपचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असता तो करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. फणस डोक्यात पडून रिक्षाचालकाच्या मणक्याला गंभीर दुखापत झालेली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, मात्र या रिक्षाचालकाला करोनाची लागण कशी झाली हे समजू शकलेलं नाही.

“रिक्षाचालक व्यक्ती कासरगोडमधील बेलूर भागात राहणारा आहे. तो झाडावरुन फणस काढत असताना एक फणस त्याच्या डोक्यावर पडला. यामध्ये त्याच्या मणक्याला दुखापत झाली. या अपघातात त्याच्या हाता-पायालाही दुखापत झालेली आहे. दुखापत पाहता रुग्णावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचं स्पष्ट झालं. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाची करोना चाचणी करायची हा आमचा नियम आहे, यासाठी केलेल्या चाचणीत रिक्षाचालकाचा अहवाल पॉजिटीव्ह आला.” परियारम मेडीकल कॉलेजचे superintendent डॉ. के. सुदीप यांनी माहिती दिली.

“या रुग्णामध्ये करोनाची लक्षण आढळून आलेली आहेत. मात्र हा रिक्षाचालक कोणत्याही करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची किंवा प्रवासाला गेल्याची माहिती मिळालेली नाही. रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशामार्फत त्याला ही लागण झाली आहे का हे देखील स्पष्ट सांगता येणार नाही. एकदा त्याने एका रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आणून सोडलं होतं. त्यामुळे या रुग्णाला करोनाची लागण नेमकी कशामार्फत झाली याचा आम्ही तपास करत आहोत.” खबरदारीचा उपाय म्हणून रिक्षाचालकाच्या परिवारातील व्यक्ती व मित्रांकडेही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेल्या दोन दिवसांमध्ये केरळमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत १०४ ने वाढ झालेली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे प्रवास करुन आल्याचं निष्पन्न झालेलं असल्यामुळे स्थानिक सरकारसमोरील चिंतेत अधिक भर पडलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button