breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, पण जाणार का? म्हणाले..

मुंबई | २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रमाणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आलं आहे. हे आमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी पत्राची पोचपावती म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला आभारपर पत्र लिहिले आहे.

शरद पवार यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले. यासाठी मी खूप आभारी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम भारतातच नाहीत तर संपूर्ण जगभर पसरलेल्या भक्तांसाठी श्रद्धा आणि आस्थेचे प्रतिक आहे. अयोध्येतील सोहळ्यासाठी रामभक्तांमध्ये उत्सुकता आणि आतुरता आहेत. अनेक रामभक्त तिथे मोठ्या संख्यने उपस्थित राहतील. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल.

हेही वाचा    –    राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत शिवसेनेची घटनादुरूस्ती, ठाकरे गटाने दाखवला २०१३चा व्हिडीओ

२२ जानेवारीच्या सोहळ्यानंतर श्री रामाचे दर्शन सहज आणि आरामदायी घेता येईल. माझा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित आहे. मी येईन तेव्हा श्रद्धापूर्वक रामाचं दर्शन घेईन. तोवर राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं असेल. तुमच्या स्नेहपूर्ण निमंत्रणासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छांचा स्वीकार करा, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

या पत्रानुसार शरद पवार २२ जानेवोरी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. तसंच, राम मंदिरांचं बांधकाम पूर्ण झाल्यावरच ते अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. इंडिया आघाडीतील अनेक घटकपक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्यानंतर आता शरद पवारांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button