breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला भर चाैकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

वर्धा |महाईन्यूज|

हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात शाळेत शिकवणीसाठी जात असलेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची घटना सकाळी उघडकीस आली. यात तरुण शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. आरोपी तरुणांचे नाव विकेश नगराळे असे आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून हिंगणघाट पोलीस त्याच्या मागावर आहे.

संशयित आरोपी असलेल्या तरुणाचे लग्न झाले असून या तरुण आणि तरुणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ही शिक्षिका शहरातील तुळसकर कॉलेजमध्ये तासिकेनुसार शिकवणी करत होती. सकाळी शाळेवर जातं असतानाच आरोपीने नंदोरी चौकात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले. यात शिक्षिका चाळीस टक्के जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटना स्थळावरून आरोपी फरार झाला असून हिंगणघाट पोलीस आरोपीच्या मागावर आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. तरुणीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button