breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! नातवंडांकडून आजोबाचा खून

नाशिक | महाईन्यूज

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीच्या डोंगरालगत खड्ड्यात आमदार हिरामण खोसकर यांचे चुलते रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तिघा संशयित नातवंडांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली आहे. सातपूर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी (दि.३१) रात्री रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक शांतिलाल चव्हाण यांनी फिर्याद दिलेली आहे.

मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे घाव आढळून आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचे गिरणारे गावापासून पुढे काही अंतरावर नाईकवाडी गाव आहे. त्यांच्या भाऊबंदापैकी एका चुलत्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. तसेच दुसरा भाऊ काशीनाथ खोसकर हेदेखील मागील पाच दिवसांपासून बेपत्ता आहेत. खोसकर बंधूंपैकी एकाचा खून तर दुसरे अजूनही बेपत्ता असून, तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे. या घटनांमुळे नाईकवाडी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. ज्यांचा खून झाला ते रामदास हे बेपत्ता असलेले काशीनाथ यांचे मोठे बंधू होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button