breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

ऊसतोड मजुरांना अडवल्यामूळे आमदार सुरेश धस यांना अटक, तर गुन्हा नोंदवून जामिनावर सुटका

आष्टी | उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आमदार सुरेश धस यांनी आज (१६ सप्टेंबर) शिराळ वाकी चौकात मजुरांच्या गाड्या अडवत त्यांना परत जाण्याचे आवाहन केले. यानंतर आष्टी पोलिसांनी धस यांना अटक केली होती. दरम्यान, त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे.

आष्टीहून नेणाऱ्या ४०० ते ४५० मजूर आपल्या लहान मुलांसह जात होते. कोरोना टेस्ट नाही, सोशल डिस्टंसिंग नाही किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही काळजी घेतलेली नाही. हा प्रकार पाहत धस यांनी मजूरांना अडवले. कुठलाही कारखाना सुरू नसताना मजूर नेण्याची घाई कशाला, असा प्रश्न धस यांनी विचारला आहे.

मुकादम आणि मजूरांच्या वाढीसाठी जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत संप सुरू असेल. या काळात राज्यात कुठल्याही प्रकारे कारखानदार वाहतूक करणार असतील तर संप आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा धस यांनी दिला आहे. दरम्यान, काही वेळानंतर धस यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात आमदार सुरेश धस यांनी एका टॅक्टरमधून जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना विनंती करून घरी पाठवले होते. त्यानंतर आज आष्टीत एका टेम्पोतून मजूर कारखान्याकडे जात असल्याचे आ.धस यांना समजले. त्यांनी मजुरांना घरी परतण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र,धस यांनी आक्रमक भूमिका घेत मजुरांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण एकही मजूर कारखान्याकडे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली होती.दरम्यान, त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आष्टीतील खडकत चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button