breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूज’च्या बातमीचा प्रभाव, अंमली पदार्थ विरोधी पथकाची हुक्का पार्लरवर कारवाई

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाल्हेकरवाडी येथे सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर छापा मारला आहे. 20 हजार 350 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

विजय उर्फ बसवराज शिवानंदन बिराजदार (वय 28, रा. शिंदे वस्ती, रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई कुटे यांना माहिती मिळाली की, वाल्हेकरवाडी जवळ ‘टॉप 87’ या हॉटेलवर बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून 20 हजार 350 रुपयांचे साहित्य जप्त केले. हॉटेलमधील ग्राहकांना हुक्का पुरवणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकावर सिगरेट आणि तत्सम तंबाखूचे उत्पादन (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियमान्वये देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button