breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

१३ वर्षीय कोरोनाग्रस्त मुलाने हॉस्पिटलमधूनच दिली ऑनलाईन परीक्षा

नवी मुंबई – अनेक शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले असून आता ऑनलाईन चाचणी परीक्षाही सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन परीक्षाही देता येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु, कोरोनाने ग्रस्त असलेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्यांने रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रुग्णालयातून ऑनलाईन परीक्षा दिली आहे. तेरणा हॉस्पिटलच्या प्रशासनाने विद्यार्थ्याला मदत केली.

निरंजन कदम (वय १३ वर्षे ) व त्याचे आई वडिल ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना पॉजिटीव्ह झाले होते व तिघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आले असल्यामुळे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये भरती करण्यात आली. आठवी मध्ये असलेला निरंजन हा नवी मुंबईतील एका खाजगी शाळेमध्ये शिकत असून नेमकी त्याची परीक्षा ( ऑनलाईन ) याच वेळी आली होती. मात्र तो रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्याला ही परीक्षा देता येणार नव्हती, म्हणून तो थोडासा नाराज होता. त्याने ही खंत तेरणा हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे बोलून दाखवली. लॉकडाउन काळामध्ये निरंजनने एकदाही ऑनलाईन शाळा चुकविली नव्हती, व त्यामुळे या परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळतील याची खात्री होती. या संपूर्ण प्रकरणाची माहिती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला कळविण्यात आली व निरंजनला ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी हॉस्पिटल सर्वतोपरी मदत करेल असे त्यांच्या पालकांना सांगण्यात आले.

नवी मुंबई महानगर पालिकेने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून निरंजनसाठी वॉर्डमध्ये परीक्षेसाठी टेबल खुर्ची तसेच वायफाय इंटरनेट व लॅपटॉपची सुविधा देण्यात आली. निरंजननेसुद्धा कोरोना आजाराला न घाबरता सलग चार दिवस परीक्षा दिली व त्या परीक्षेत त्याला पूर्ण मार्क पडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button