क्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

सोळा तरुणांचा लडाखपर्यंत सायकल प्रवास

'माणसं जिवाभावाची' समूहाच्यावतीने छत्रपती शिवरायांना अनोखे वंदन

पुणे : छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि शिवरायांचे स्मरण म्हणून संपूर्ण देश सायकलवर पिंजून काढायची मोहीम आखली. त्याचा संकल्प सोडण्याची तारीख ठरली ३० सप्टेंबर २०२३ आणि मग ‘माणसं जिवाभावाची’ हा समूह लागला कामाला आणि अखेर 16 मावळ-मुळशीतील जिगरबाज मावळ्यांच्या टीमने “लेह(खारदूंगला पास) ते कन्याकुमारी” असा तब्बल ४२८० किलोमीटर सायकल प्रवास लेह लडाखपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

या मोहिमेची सुरुवात बाणेर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन, रुग्णवाहिका आणि सायकल पुजन करून ता.२४ सप्टेंबर रोजी करण्यात आली. प्रत्यक्ष मोहिम ता.३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. जगातील सर्वात उंच शिखर खरदूंग ला (लेह -लडाख) इथून करण्यात आली होती.

या सायकल मोहिमेत (लेह खारदूंगला – ) इथून पुणे परिसरातील १२ मावळातील विनायक दारवटकर, किरण शेळके, हनुमंत जांभुळकर, विशाल डुंबरे, संदीप गोडांबे, दत्ता म्हाळसकर आणि सहकारी सहभागी झाले आहेत. यावेळी या मावळ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करून उणे -3.7’C तापमानामध्ये करुन, ध्येयमंत्र व शिवावंदना घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात सायकल मोहीमेला सुरुवात केली.

मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी.. हर हर महादेव च्या घोषणांनी परिसर दणानून सोडला. यावेळी या युवकांनी मावळ्यांचा वेश परिधान केला होता. तसेच हातात भगवा, तसेच राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन शिवरायां बरोबर आपल्या मातृभूमीस नमन केले. सदर मोहिमेसाठी बाणेर येथील जयेश मुरकुटे सोशल फांडेशनकडून रुग्वाहिका उपलब्ध करून देण्यात आली.

‘शिवराय असे शक्तिदाता’
या टीमने याआधी बऱ्याच मोहिमा यशस्वी पार केल्या होत्या. जसे की आग्रा ते राजगड ‘गरुडझेप मोहीम’, ‘पानिपत मोहीम’, ‘राजगड ७५ वेळा सर’; पण ही मोहीम काही वेगळीच होती. या मोहिमेत समावेश होता तो सायकलचा मार्ग ठरला जगातील सर्वांत उंच मार्ग जिथं आहे ते ठिकाण खारदुंगलापास ते कन्याकुमारी मोहिमेचे नाव शिवरायांचे स्वप्न असेतु हिमालय अटक ते कटक आणि हे स्वप्न अठराव्या शतकात मराठ्यांनी पूर्ण केलं; पण राजकीय मानसिकतेत आपला देश विभागला गेला आणि आजचा जो हिंदुस्थान आहे सिंधू नदी खारदुंगलापास लेहपासून ते कन्याकुमारीपर्यंत यात १२ राज्ये आणि ५४ मुख्य शहरे येतात तोच शिवस्मरण मार्ग. ‘शिवराय असे शक्तिदाता’ हे घोषवाक्य घेऊन मराठे मावळे २७ सप्टेंबरला लेहला पोहोचले. प्रवास अतिशय खडतर होता, खरदुंला येथे ऑक्सिजन कमी असल्याने दम लागणे, डोके दुखणे, त्यामध्ये हाडे गोठवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली होती.

सायकल प्रवास करणाऱ्या 16 जणांच्या टीमचे सदस्य
विनायक दारवटकर, किरण शेळके, हनुमान जांभूळकर, दत्तात्रय म्हाळसकर, संदीप गोडांबे, विशाल डुंबरे, राकेश धावडे आणि यांना मदतीसाठी अशोक सरपाटील, राजेंद्र बेंद्रे, विश्वास कळमकर, दादाराव दाभाडे, संदीप कळमकर, प्रकाश खाणेकर, गणेश जाधव.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button