breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजितदादांनी पुणे-पिंपरी चिंचवडकरांना दिला ‘हा’ इशारा

बाहेर फिरताना मास्क न वापरल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड

पिंपरी |महाईन्यूज|

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड करण्याचा मानस असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सूचक वक्तव्य केलं आहे. याद्वारे त्यांनी करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. चिंचवड येथील आॅटो क्लस्टर कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापाैर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, उपमहापाैर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर आता जर पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क वापरला नाहीतर एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार सुरू आहे. त्याशिवाय नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत नाही. सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. फिजिकल डिस्टसिंग ठेवलेच पाहिजे. हे सर्व नियम नागरिकांनी कटाक्षाने पळाले पाहिजेत, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवले.

तसेच काळजी घ्या सुरक्षित रहा…!आज सर्वांच्या साक्षीने मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थतीमध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले, असे जाहीर करतो…परंतू, हे जाहीर करत असताना कुठल्याच रुग्णालयात जाण्याची कुणावरही वेळ येऊ नये असे वाटते. असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button