breaking-news

उपमहापौरपदावरून आघाडीत बिघाडीची शक्यता

कोल्हापूर | महाईन्यूज

गेल्या नऊ वर्षांपासून महापालिकेमध्ये सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीमध्ये उपमहापौरपदावरून कमालीची धूसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या या पदावर काँग्रेसने कब्जा केला आहे; त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. या पदावरून आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तविली जाते आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यासाठी केवळ आठ महिन्यांचा अवधी बाकी आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्येही पदासाठी चढाओढ सुरू आहे. काँग्रेसमध्ये महापौरपदासाठी पाच सदस्य इच्छुक आहेत; तर राष्ट्रवादीतून स्थायी समिती सभापतिपदासाठी तीन सदस्यांमध्ये चुरस आहे. उपमहापौरपदासाठी तीन सदस्यांमध्ये चढाओढ आहे. भाजपमध्येही विरोधी पक्षनेते, गटनेतेसाठी इच्छुकांमध्ये घालमेल सुरू होती. यापूर्वी उपमहापौरपदासाठी फारसे कोणीही इच्छक नव्हते. गेल्या पाच वर्षांत मात्र, या पदासाठीही चुरस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button