breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Saurabh Gokhale slams Sujay Dahake : सुजय डहाके तुमची लायकी नाही; तुमच्यावर कोणी प्रतिक्रिया द्यायला : अभिनेता सौरभ गोखले

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

मराठी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख भूमिकेत केवळ ब्राह्मण मुलीच दिसतात. इतर मराठी मुली का दिसत नाही? अशी टीप्पण्णी दिग्दर्शक सुजय डहाके यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अभिनेता सौरभ गोखले यानेही सुजयच्या वक्तव्याविरोधात फेसबूक पोस्ट लिहिली आहे आणि त्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

काय म्हटलं आहे सौरभ गोखलेने ?

स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके….आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही. पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button