breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

फोनची बॅटरी लवकर संपतेय? तर आजच ‘या’ सेटिंग करा

Smartphone Battery Life | धावपळीच्या रुटीनमध्ये सध्या फोन ही अत्यावश्यक गोष्ट दिवसेंदिवस होत चालली आहे. अगदी छोट्या कामांपासून ते कम्प्यूटरवरही काही काम ते ऑफिसच्या कामांपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या एका फोनवर होतात. धावपळ आणि फोनच्या सतत वापरामुळे फोनची बॅटरी संपते किंवा बऱ्याचवेळी फोन पूर्ण चार्ज करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुमच्या फोनची बॅटरी टिकवण्यासाठी हे काही सोपे उपाय तुम्ही केलेत तर तुमचा मोबाईल तुम्हाला जास्त वेळ वापरून काम करता येईल.

बॅटरी सेव्हर मोड ऑन करा : बॅटरीशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्याआधी तुमच्या फोनची बॅटरी कशामुळे संपत आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला अँड्रॉइडच्या सेटिंगमध्ये जाऊन बॅटरी सेव्हर मोड ऑन करावा लागेल.

हेही वाचा    –    शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला; म्हणाले.. 

स्क्रीन रिझोल्यूशन कमी करा : सर्व फोन आपल्याला स्क्रीन रिझोल्यूशन सेटिंग करण्याची परवानगी देत नाहीत. पण सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोनबद्दल बोलायचे झाले तर तो क्वाड-एचडी+ डिस्प्लेसह येतो आणि डिफॉल्टनुसार तो फुल-एचडी+ आहे. हे बॅटरीचा कमी ड्रेन करण्यासाठी आहे. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन स्क्रीन रिझोल्यूशन कमी करा.

नोटिफिकेशन बंद करा : आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले जवळजवळ प्रत्येक ॲपचे आपल्याला कधी ना कधी नोटिफिकेशन नक्कीच येतात. यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन बंद करावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button