breaking-news

लग्नपत्रिका वाटप करून परतत असताना दोघांवर काळाची झडप

कुर्डुवाडी | महाईन्यूज

भावाच्या लग्नाची पत्रिका बारलोनी ( ता माढा) येथे पाहुण्यांना वाटून माघारी कण्हेरगाव (ता. माढा) या मूळगावी जाताना कुर्डु हद्दीत समोरून येणाऱ्या पिकअपला समोरासमोर धडक बसून दुचाकीवरील नवरदेवाचा भाऊ अभिजित रमेश मोरे ( वय 22, रा. कण्हेरगाव ) व समवेत असलेले आजोबा महादेव नामदेव डांगे ( वय 70 रा. पिंपळनेर ता. माढा ) हे दोघेजण जागीच ठार झालेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कण्हेरगाव (ता. माढा) येथील रमेश मोरे यांचा मुलगा किशोरच्या असणाऱ्या 14 फेब्रुवारी दिवशीच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन त्याचा भाऊ अभिजित मोरे व मुलाचे आईकडील आजोबा महादेव डांगे हे तालुक्यातील बारलोनी गावी पाहुण्यांच्या पत्रिका घेऊन गेले होते. त्यावेळी माघारी परतत असताना कुर्डुवाडी ते कुर्डु रस्त्याच्या दरम्यान कुर्डुच्या हद्दीत समोरून येणाऱ्या चारचाकी पीकअप (एम एच 24-ए बी 6325) या भरधाव येणाऱ्या गाडीने मोरे यांच्या दुचाकी (एम एच 45 डब्लू 9943 ) या गाडीला जोराची धडक बसली. त्यात ते दोघेही जागीच ठार झाले आहेत. अपघातानंतर पिकअप चालक पळून गेलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button