breaking-newsआंतरराष्टीय

इस्लामिक लग्नात स्त्री-पुरुषांनी एकत्र जेवणे ‘पाप’ – दारुल उलूम

कुठल्याही कार्यक्रमामध्ये स्त्री आणि पुरुषांनी एकत्र अन्न-पदार्थांचे सेवन करणे इस्लामविरोधी आहे तसेच उभे राहून खाणे सुद्धा चुकीचे आहे असे दारुल उलूम देवबंदने मंगळवारी जारी केलेल्या नव्या फतव्यामध्ये म्हटले आहे. दारुल उलूम देवबंद ही इस्लामिक शिक्षण देणारी संस्था आहे. लग्नसोहळा आणि अन्य कार्यक्रमामध्ये स्त्री-पुरुषांच्या एकत्र अन्न सेवनाबद्दल इस्लामिक नियम काय आहेत ? अशी देवबंद येथे राहणाऱ्या नागरिकाने दारुल उलूमकडे विचारणा केली होती तसेच उभे राहून जेवण करणे सुद्धा योग्य आहे का ? असा प्रश्न सुद्धा त्याने विचारला होता.

या प्रश्नांना उत्तरे देताना दारुल उलूमने शरीयत अंतर्गत दोन्ही कृती इस्मामविरोधी आणि निषिद्ध आहेत. दारुल उलूमच्या दारुल इफ्ता या शाखेने यासंबंधी एक फतवा जारी केला आहे. लग्नसोहळा आणि अन्य कार्यक्रमांमध्ये स्त्री-पुरुषांनी एकत्र अन्न सेवन करणे हे पाप आहे तसेच उभे राहून जेवणे सुद्धा नाजायज आहे असे त्या फतव्यात म्हटले आहे.

उभे राहून जेवण्यामध्ये मुस्लिम समजाचे नुकसान असून मुस्लिमांनी असे प्रकार टाळले पाहिजेत असे दारुल उलूमने म्हटले आहे. देवबंदमधील इस्लामिक धर्मगुरु मुफ्ती कासमी यांनी या फतव्याचे समर्थन केले आहे. अनोळखी पुरुष उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमध्ये महिला सहभागी होतात हे मुस्लिम महिलांसाठी चांगले नाही. इस्लामिक नियमांनुसार हे पाप आहे. मुफ्ती कासमी यांनी सर्व मुस्लिमांना या फतव्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दारुल उलूम देवबंदकडून असे फतवे जारी झाल्यानंतर ते नेहमीच चर्चेत येतात. याआधी मुस्लिम महिलांनी केस कापू नये, तसेच त्यांच्या भुवयाही कोरु (आय-ब्रो) नयेत असा एक फतवा ‘दारुल उलूम देवबंद’ने जारी केला होता. एका मुस्लिम माणसाने ‘मुस्लिम धर्मात महिलांनी केस कापणे आणि भुवया कोरणे योग्य आहे का?’ असे विचारले होते. त्यानंतर काही दिवसातच हा फतवा जारी करण्यात आला होता. मुस्लिम धर्मातील महिलांनी केस कापले किंवा भुवया कोरल्या तर ते इस्लामच्या विरोधातील वर्तन आहे असे मानले जाईल असा उल्लेख या फतव्यात करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button