breaking-newsआंतरराष्टीय

कोकेनची २४६ पाकिटं गिळून तस्करी करण्याचा प्रयत्न, विमानातच प्रवाशाचा मृत्यू

कोकेनची तस्करी करण्याच्या प्रयत्नात जपानमधील नागरिकाचा विमान प्रवासातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकाने तस्करी करण्यासाठी कोकेनची २४६ पाकिटं गिळली होती. अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी अनेकदा ही शक्कल लढवली जाते. कोलंबियामधील बोगोटा ते टोकियो दरम्यान विमान प्रवासातून तस्करी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण त्याचा हा प्रयत्न जीवावर बेतला आणि अखेर मृत्यू झाला.

प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर विमानाची मेक्सिकोमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. या व्यक्तीची ओळख पटली असून तो ४२ वर्षांचा होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याने बोगोटा ते मेक्सिको शहरादरम्यान प्रवास केल्यानंतर जपानला जाणाऱ्या विमानाने पुढील प्रवास सुरु केला होता.

विमानातील कर्मचाऱ्याला प्रवाशाची प्रकृती अस्वस्थ असल्याचं लक्षात आल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. प्रवाशाने कोकेनची २४६ पाकिटं गिळली होती. प्रत्येक पाकिट १ ते २.५ सेंटीमीरटरचं होतं. शवविच्छेदन अहवालात पोटात कोकेनची पाकिटं असल्याचं निदर्शनास आलं. अंमली पदार्थांचा अतिरेक झाल्यानेच मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button