breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नळ कनेक्शनला लावणार मीटर, वॉटर ऑडिट होणार

सोलापूर | सोलापूर शहरात पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटीअंतर्गत विविध उपाय योजना सुरु आहेत. याचाच भाग म्हणून शहरात वॉटर ऑडिट करण्यात येणार आहे. अनेक वर्ष जुनी पाईपलाईन, त्यामधून होणारी गळती, पाण्याची होणारी चोरी या कारणांमुळे सोलापूरकरांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. यातून सोलापुर करांची सुटका होणार आहे. मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पावसाळ्यात मुबलक पाणी साठी असताना देखील दररोज पाणी पुरवठा करता येऊ शकत नाही. मात्र यावर उपाय म्हणून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उजनीपासून ११० एमएलडीची नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणे शक्य होणार आहे.

सोलापुरात कोण किती पाणी वापरतं, कुठे अवैध नळाचे कनेक्शन आहेत, जुन्या पाईपलाईनमुळे होणारी पाण्याची गळती यामुळे पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. यासगळ्याची माहिती मिळण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वॉटर ऑडिट करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button