breaking-newsमनोरंजन

इतक्या कोटींना विकला जाऊ शकतो आर. के स्टुडिओ?

आर. के. स्टुडिओ आणि बॉलिवूडचं नातं खूप जुनं आणि सर्वाथानं खास आहे. बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार हा स्टुडिओ आहे. कित्येक सुपरहिट चित्रपट या स्टुडिओच्या साक्षीनं तयार झाले आहे. ‘शो मॅन’ राजकपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली. जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ स्वप्ननगरी मुंबईतील चेंबूर भागात मोठ्या दिमाखात हा स्टुडिओ उभा आहे. या स्टुडिओची सध्याची विक्री किंमत ही जवळपास ५०० कोटींच्या घरात असल्याचं समजत आहे.

हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय नुकताच कपूर कुटुंबियांनी जाहीर केला आहे. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच कमी आहे तर त्याच्या देखभालीचा खर्च मात्र न परवडण्यासारखा आहे म्हणूनच हा स्टुडिओ विकत असल्याचं ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूरनं आधीच स्पष्ट केलं आहे. चेंबूरमधील २ एकर परिसरात असलेल्या या स्टुडिओचं मुल्य हे पाचशे कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे.

स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबधीत प्रत्येकाला देण्यात येणार असल्याचं कपूर कुटुंबियांनी आधीच स्पष्ट केलं आहे. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला. २०१७मध्ये स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर या वास्तूचं आणि त्यात संग्रहीत केलेल्या अमुल्य आठवणींचंही नुकसान झालं त्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्च कपूर कुटुंबियांना परवडत नव्हता.

तसेच अनेक कलाकारांनीही या स्टुडिओकडे पाठ फिरवली होती म्हणूनच काळजावर दगड ठेवून आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतल्याचं ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूरनंही स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने ऐतिहासिक आर. के. स्टुडिओ विकत घेऊन त्या जागेवर हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय उभारावे अशी मागणी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button