breaking-newsआंतरराष्टीय
सीरियाच्या बाजारपेठेवर रशियाचा हवाई हल्ला; २७ जण ठार
सीरियाच्या वायव्येकडे असलेल्या एका बाजारपेठेवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सोमवारी २७ जण ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. तथापि, या हल्ल्यास आम्ही जबाबदार नाही, ते वृत्त खोटे आहे, असा दावा रशियाने केला आहे.
सीरियाच्या या भागामध्ये रशियाच्या हवाई दलाने कोणतीही मोहीम हाती घेतलेली नाही, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. इडलिब प्रांतातील मारेत-अल-नुमन शहरातील भाजीपाला बाजारपेठेवर सोमवारी सकाळी करण्यात आलेल्या हल्ल्यात २५ नागरिक आणि अन्य दोन जण ठार झाल्याचे मानवी हक्क संघटनेने म्हटले आहे.
या हल्ल्यामध्ये ४५ हून अधिक जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असे मानवी हक्क संघटनेने सांगितले.