breaking-newsपिंपरी / चिंचवड

पर्यावरण पूरक, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करू

 ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे यांचे आवाहन 
पिंपरी –  गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची पूर्वतयारी चालू आहे. मात्र, आपल्या शहरात असणाऱ्या नद्यांना अतिप्रदुषित झालेल्या आहेत.  शहरात प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रयत्न करावेत, असे आवाहन ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे यांनी केले आहे.
नगरसेविका करुणा चिंचवडे यांनी आयुक्त, महापौर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे उपलब्ध माहितीच्या आधारे शहरातल्या नागरिकांच्या संपर्क क्रमांकावर प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक  गणेशोत्सवाचे प्रबोधनात्मक संदेश पाठविण्यात यावेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी प्रणालीद्वारे या काळात नागरिकांना संपर्क केल्यास प्रबोधनात्मक ऑडिओ क्लिप ऐकवली जावी. महापालिकेच्या ८ हि क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रात विसर्जन घाट बरोबरच ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत त्या त्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीचे ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद मोठया प्रमाणात उभारावेत जेणेकरून नदीवर येणारा भाविक वर्ग विभागला जाऊन जास्तीत जास्त नागरिक विसर्जन हौदात विसर्जन करण्यास प्राधान्य देतील यामुळे नदीमध्ये विसर्जन करणाऱ्याची संख्या अंशतः आपण कमी करू शकू त्याचबरोबर नदीप्रदूषण हि कमी होणार आहे.
आरोग्य विभाग, शहरातील सामाजिक पर्यावरणवादी संस्थांना बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक प्रत्येक विसर्जन घाट येथे उभे करून नदीवर येणारे निर्माल्य नदीत न टाकता ” निर्माल्य कलाशा” मध्ये टाकावे यासाठी प्रयत्न करावेत. पूर्वतयारीच्या बैठका, सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त गणेशोउत्सव साजरा करण्यावर भर दयावा यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात यावे. गणेशोउत्सवाच्या काळात व विसर्जनांनंतर नद्यांचे प्रदूषण सर्वाधिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांनी होते तरी किमान या वर्षी नाही तरी पुढच्या वर्षी साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती विक्री आणि बनविणे यासाठी कायमस्वरूपी बंदी आणावी  आपण सगळ्यांनी स्वतःपासून सुरवात करून सामाजिक जाणिवेचे आणि पर्यावरणाचे भान ठेऊन प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक गणेशोउत्सव साजरा करण्यावर भर देऊन आपल्याच जलस्त्रोताचे रक्षण करू या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button