breaking-newsराष्ट्रिय

जम्मू- काश्मीरमध्ये ‘हिज्बुल’च्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

अनंतनागमधील कोकेरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मंगळवारी सकाळपासून या भागात शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या २३ दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवत  १८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. गेल्या आठवड्यात गुरुवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे दादसारा येथे एक दहशतवादी मारला गेला होता. तो मारला गेलेला दहशतवादी म्हणजे झाकीर मुसा असल्याचे उघड झाले होते. मुसा हा अल- कायदाशी संबंधित असलेल्या अन्सार गझवट उल हिंद या संघटनेचा प्रमुख होता.

दुसरीकडे गेल्या चार महिन्यांमध्ये दहशतवादविरोधी मोहीमेदरम्यान ६१ जवान शहीद झाले आहेत. तर ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १४२ नागरिक जखमी झाले असून गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यात दहशतवादाशी संबंधित १७७ घटना घडल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button